शूटिंग सेटवर लाइटमनचा धक्कादायक मृत्यू, दिग्दर्शक अडकला कायद्याच्या कचाट्यात

शूटिंग सेटवर लाइटमनचा धक्कादायक मृत्यू, दिग्दर्शक अडकला कायद्याच्या कचाट्यात

झगमगत्या विश्वात कधी काय होईल सांगता येत नाही. सध्या साऊथ फिल्मइंडस्ट्रीतील अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नुकताच, हेमा समितीच्या अहवालाबाबत मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील अनेक रहस्य उघड झाली आहेत. अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेले अत्याचारांवर अनेक वर्षांनंतर आवाज उठवला. ज्यामुळे अनेक सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता साऊथ फिल्मइंडस्ट्रीतील आणखी एक दिग्दर्शक वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कन्नड सिनेमा निर्माते योगराज भट यांचे नाव चित्रपटाच्या शूटिंग सेटवर लाइटमनच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. दिग्दर्शकाच्या हलगर्जीपणामुळे काहीही चूक नसलेल्या लाइटमनचा धक्कादायक मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगराज भट यांच्यावर तक्रार देखील दाखल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रोजी योगराज एक सिनेमाचं शुटिंग करत होते. त्याच दरम्यान, एक मोठी दुर्दैवी घटना घडली. योगराज यांच्या टीममधील मोहन कुमार पायऱ्यांवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाली. पडल्यानंतर मोहन यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात गेल्यानंतर मोहन यांना मृत घोषित केलं.

लाइटमनच्या धक्कादायक मृत्यूनंतर योगराज यांच्या सिनेमाची शुटिंग बंद करण्यात आली आहे. योगराज भट यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी योगराजशिवाय मृताच्या भावाने सहाय्यक दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या निर्मात्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;