बिहारमध्ये रेल्वे दुर्घटना, कपलिंग तुटल्याने मगध सुपरफास्ट एक्सप्रेस दोन भागांमध्ये विभागली

बिहारमध्ये रेल्वे दुर्घटना, कपलिंग तुटल्याने मगध सुपरफास्ट एक्सप्रेस दोन भागांमध्ये विभागली

बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये रेल्वेची विचीत्र दुर्घटना घडली आहे. नवी दिल्लीवरुन इस्लामपूरला जाणाऱ्या मगध एक्सप्रेसची कपलिंग तुटल्याने ट्रेन दोन भागांमध्ये विभागली. सदर घटना आज सकाळी 11 च्या दरम्यान घडली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सरस्वती चंद्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, नवी दिल्लीवरून इस्लामपूरला जाणाऱ्या मगध एक्सप्रेस (20802) या गाडीची कापलिंग अचानक तुटली. त्यामुळे ट्रेन तुरीगंज आणि रघुनाथपूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दोन भागांमध्ये विभागली गेली. घटनेची माहिती मिळता बचाव पथक आणि तांत्रिक पथके घटनास्ठळी पोहचली आहेत. ही घटना कशामुळे घडली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे सरस्वती चंद्रा म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;