कामधंदा करण्याचा सल्ला ऐकताच मुलगा संतापला, जेवणाच्या ताटावरच बापाचा जीव घेतला

कामधंदा करण्याचा सल्ला ऐकताच मुलगा संतापला, जेवणाच्या ताटावरच बापाचा जीव घेतला

कामधंदा करण्यास सांगितल्याने संतापलेल्या मुलाने डोक्यात दगड घालून बापाची हत्या केल्याची घटना धुळ्यात घडली आहे. बापाची हत्या केल्यानंतर मुलगा फरार झाला आहे. बापू पांड्या कुवर असे मयत बापाचे तर विजय कुवर असे आरोपी मुलाचे नाव आहे. शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पिंपळनेर पोलिसांना कळवले.

साक्री तालुक्यातील खरगावमध्ये राहणारे बापू कुवर हे शेती करत होते. तर त्यांचा 25 वर्षाचा मुलगा विजय हा काहीच कामधंदा करत नसे. जेवण करत असतानाच बापाने मुलाला काहीतरी कामधंदा करण्याचा सल्ला दिला. पण हा सल्ला ऐकताच मुलगा संतापला आणि बापाच्या डोक्यात दगड घातला. यात त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. बापू यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेनासाठी रुग्णालयात पाठवला. विजय हा रागीट स्वभावाचा असून त्याला मानसिक समस्या असल्याचे कळते. पोलिसांनी फरार विजयचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;