इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर Moeen Ali आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर Moeen Ali आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर मोइन अलीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी त्याची इंग्लंडच्या संघात निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त करत निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. मात्र तो देशांतर्गत लीग सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.

मोईन अलीने डेली मेल या इंग्रज वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. तो म्हणाला की, मी आता 37 वर्षांचा आहे आणि या महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी माझी निवड करण्यात आलेली नाही. मी इंग्लंडसाठी खूप क्रिकेट खेळलो आहे. मला सांगण्यात आले होते की, आता पुढच्या पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मला वाटलं निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी माझे काम केले आहे, असे म्हणतं मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

मोईन अलीने इंग्लंडकडून 2014 साली आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने इंग्लंडकडून 68 कसोटी, 138 वनडे आणि 92 टी20 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर मोईन अली 2019 चा वनडे वर्ल्ड कप आणि 2022 चा टी20 वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडच्या संघाचा भाग होता. त्याने इंग्लंडकडून सर्व फॉरमॅटमध्ये एकून 6678 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 8 शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 366 विकेट घेतल्या आहेत. मोईन अलीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध  खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;