अखेर ‘त्या’ मोठ्या गोष्टीवर बॉबी देओल याने केला खुलासा, म्हणाला, त्यावेळी मी…

अखेर ‘त्या’ मोठ्या गोष्टीवर बॉबी देओल याने केला खुलासा, म्हणाला, त्यावेळी मी…

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल याचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. बॉबी देओल याने त्याच्या आयुष्यात अनेक मोठे चढउतार नक्कीच बघितले आहेत. अॅनिमल चित्रपटामध्ये धमाकेदार अभिनय बॉबी देओलने केला, त्याच्या अभिनयाचे काैतुक देखील करण्यात आले. आश्रमनंतर त्याला एक वेगळीच ओळख मिळाली. बॉबी देओल याने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, त्याच्या मुलांना बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे. माझी मुले आहेत तरीही त्यांना संघर्ष हा करावाच लागेल असेही बॉबी देओल याने म्हटले.

आता नुकताच बॉबी देओल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये बॉबी देओल हा त्याच्या आयुष्यातील वाईट काळातबद्दल बोलताना दिसला. बॉबी देओल म्हणाला की, माणूस ज्यावेळी दारूच्या नशेत जातो, त्यावेळी त्याला काहीच कळत नाही. वाईट बरोबर कळत नाही. कोण आपल्याला काहीतरी सल्ला देत आहे याचाही विचार आपण त्यावेळी अजिबात करत नाही.

बॉबी देओल पुढे म्हणाला की, मी माझ्या कुटुंबियांच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी एक चिंता बघितली. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. पण मी दारूच्या नशेत होतो मला काहीच कळत नव्हते. त्यानंतर मी खूप मोठा संघर्ष करून या सर्वांमधून बाहेर पडलो. दारू आणि इतर नशांमधून बाहेर पडणे माझ्यासाठी खरोखरच इतके जास्त सोपे नक्कीच नव्हते.

मला मनातून वाटले की, मी चुकीच्या मार्गावर जात आहे आणि मी त्यामधून बाहेर पडलो. एक वडिलांच्या जबाबदाऱ्यांसाठी आपण थांबले पाहिजे. आता बॉबी देओल याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. बॉबी देओल हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. आता बॉबी देओलचा चाहतावर्गही मोठा आहे.

बॉबी देओलने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितले की, माझ्या दोन्ही मुलांना अभिनय क्षेत्रामध्ये यायचे आहे. मी एक वडील म्हणून बॉलिवूड क्षेत्रामध्ये असलेले सर्व आवाहने त्यांना सांगितली आहेत. नेहमीच याबद्दल मी त्यांच्यासोबत चर्चा देखील करतो. विशेष म्हणजे माझे दोन्ही मुले हे हिंदी बोलतात, कारण हिंदी चित्रपटांमध्ये काम करायचे म्हटले की, तुम्हाला हिंदी आलीच पाहिजे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;