Aishwarya Rai: माझं काम पाहून त्यांना लाज वाटली तर…, ऐश्वर्या राय हिचं मोठं वक्तव्य

Aishwarya Rai: माझं काम पाहून त्यांना लाज वाटली तर…, ऐश्वर्या राय हिचं मोठं वक्तव्य

अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या आता बॉलिवूडपासून दूर असली तरी खासगी आयुष्यामुळे मात्र कायम चर्चेत असते. पण ऐश्वर्याच्या आयुष्यातील काही किस्से आणि घटना आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. ‘माझं काम पाहून त्यांना लाज वाटली तर माझ्यासाठी ती गोष्ट योग्य नसेल…’ असं वक्तव्य ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीत केलं होतं. ऐश्वर्या तिच्या सिनेमांमुळे कायम चर्चेत असते.

सांगायचं झालं तर, ऐश्वर्या हिने अनेक सिनेमांमध्ये रोमँटिक सीन दिले आहेत. ज्यावर अनेक वाद देखील झाले. पण करियरच्या सुरुवातीला ऐश्वर्या अशा सिनेमांपासून दूर राहिली ज्यांमध्ये रोमान्स असेल… यावर एका मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती, ‘मला हेमा मालिनी यांच्यासारखी अभिनेत्री व्हायचं आहे.’ त्यामुळे अभिनेत्रीने कधीच बोल्ड सीन दिले नाहीत.

 

एका मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती, ‘मी माझ्या कपड्यांसोबत कधीच माझ्या प्रतिभेचा त्याग करणार नाही. मला काम नाही मिळालं तरी मी आनंदी आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता… ज्या कुटुंबाच्या सूनेची जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. एक आई म्हणून तुमच्यासाठी काही गोष्टी खासगी असतात…’

 

 

‘आज मी प्रसिद्धी – लोकप्रियतेसाठी मोठ्या पडद्यावर रोमान्स करेल. पण उद्या ते सीन पाहिल्यानंतर माझ्या कुटुंबियांना लाज वाटेल आणि माझ्यासाठी ते योग्य नसेल… माझं स्टारडम 10 वर्षांपर्यंत असेल पण कुटुंब माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे…’ असं अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती.
ऐश्वर्या राय हिच्या एका सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘ऐ दिल हैं मुश्किल’ सिनेमात ऐश्वर्या हिने अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत अनेक रोमँटिक सीन दिले होते. ज्यामुळे ऐश्वर्या वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली होती. पण सिनेमातील डायलॉग आणि गाण्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;