फडणवीसांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका

फडणवीसांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्या विरोधात पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी याचिका प्रविष्ट केली आहे. निविदा काढण्यासाठी मंदिराच्या नावाने खोट्या दाखल्यांचा वापर केल्याचा आरोप त्यांनी जोशी यांच्यावर केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मानद सचिवांविरोधातील प्रकरण आता न्यायालयापर्यंत पोहचले आहे.

आंभोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 115 कोटी रुपयांच्या निविदेत पात्र ठरण्यासाठी 121 कोटी रुपयांची निविदा ‘शक्ती बिल्डकॉन’ला देण्यासाठी खटाटोप करण्यात आला. जोशी अध्यक्ष असलेल्या श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे खोटे अनुभव प्रमाणपत्र सिद्ध करून ते सार्वजनिक बांधकाम विभागात सादर केले आणि 115 कोटी रुपयांची निविदा 121 कोटी रुपयांमध्ये मिळवून दिली. या भ्रष्टाचारात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे, असा आरोप याचिकाकर्ते मोहनीश यांनी केला आहे.

याविषयी फडणवीस यांचे मानद सचिव आणि सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी, मोहनीश जबलपुरे यांचे आरोप फेटाळून लावले आहे. आपल्याविरोधातील या आरोपात काहीही तथ्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;