Kolhapur News – मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

Kolhapur News – मिरवणुकीतील लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

देशभरात सर्वत्र गणोशोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण असताना कोल्हापुरात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे.उचगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर लाईटच्या किरणांमुळे मिरवणुकीतील एका तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

कोल्हापूरात अनेक मंडळातील बाप्पाचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी बाप्पाच्या मिरवणुकीत लेझर लाईट्स, मोठ मोठे डिजे लावण्यात आले होते. या लेझर लाईट्सची किरणे थेट डोळ्यावर पडल्याने तरुणाचा डोळा लाल झाला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागल्याने त्याच्या मित्रांनी त्याला एका रुग्णालयात दाखल केले. यावेळी लेझर लाईच्या किरणांमुळे तरुणाच्या बुबुळाला इजा होऊन अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याचा डोळा लाल झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;