शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यात गणपती बाप्पाचं आगमन; पोस्ट केला खास फोटो

शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यात गणपती बाप्पाचं आगमन; पोस्ट केला खास फोटो

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेश चतुर्थीला अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्यात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा ‘किंग’ सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी गणेश चतुर्थीनिमित्त त्याने ‘मन्नत’ बंगल्यातील गणपती बाप्पाचा फोटो आवर्जून पोस्ट केला आहे. त्याचसोबत त्याने चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शनिवारी शाहरुखने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला असून त्यात गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर त्याची पत्नी गौरा खान उभी असल्याचं दिसून येत आहे. ‘गणेश चतुर्थीच्या या पवित्र प्रसंगी भगवान गणेश आपल्या सर्वांना आणि कुटुंबीयांना आरोग्य, प्रेम आणि आनंद देवो.. आणि अर्थातच भरपूर मोदकसुद्धा’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलंय.

शाहरुखसोबतच बॉलिवूडच्या इतरही कलाकारांनी शनिवारी गणपती आगमनाचे फोटो पोस्ट केले आहेत. अनन्या पांडेनं तिच्या घरातील गणपतीचे फोटो पोस्ट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमध्ये ती तिचे वडील चंकी पांडे आणि आई भावना पांडे यांच्यासोबत दिसून आली. तर अभिनेता कार्तिक आर्यनने गणेश चतुर्थीला मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. लालबागचा राजाच्या पायांवर डोकं ठेवून आशीर्वाद घेतानाचा फोटो त्याने पोस्ट केला आहे. ‘पुष्पा’ फेम साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुननेही त्याच्या घरातील बाप्पाचे फोटो पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखने 1991 मध्ये गौरी खानशी लग्न केलं. या दोघांना आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. आर्यन लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तर सुहानाने झोया अख्तरच्या ‘द आर्चीस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलंय. गेल्या वर्षी शाहरुख खानचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ यांपैकी पहिले दोन चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. तर तिसरा चित्रपट सुपरहिट होता. या तिन्ही चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर तब्बल 2500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शाहरुख या वर्षात सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता ठरला आहे. त्याने 92 कोटी रुपयांचा कर भरला आहे. आता प्रेक्षकांना शाहरुखच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता आहे. यामध्ये ‘किंग’ या चित्रपटाचा समावेश आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;