काय करताय, ही प्रायव्हेट..; पापाराझींवर भडकली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

काय करताय, ही प्रायव्हेट..; पापाराझींवर भडकली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

सध्या ‘पापाराझी कल्चर’ इतकं वाढलंय की सेलिब्रिटी कुठेही गेले तरी त्यांच्या मागे कॅमेरे घेऊन हे पापाराझी हजरच असतात. जिम, रेस्टॉरंट, एअरपोर्ट, सलून अशा अनेक ठिकाणी हे पापाराझी सेलिब्रिटींचा पाठलाग करत पोहोचतात. सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्यासमोर अत्यंत नम्रपणे वागतात. मात्र पापाराझींनी मर्यादा ओलांडली की सेलिब्रिटींच्याही संयमाचा बांध सुटतो. असंच काहीसं अभिनेत्री आलिया भट्टसोबत झालंय. नुकतंच पापाराझींनी तिला तिच्या घराजवळ पाहिलं आणि त्यांनी तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. आलियाचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करण्यासाठी ते तिच्या मागे मागे लिफ्टपर्यंत गेले. यावेळी आलियासोबत असलेल्या तिच्या टीमने पापाराझींना आत न येण्याची विनंती केली. तरीसुद्धा पापाराझी त्यांचं न ऐकता पुढे गेले. अखेर आलियाला राग अनावर झाला आणि ती पापाराझींसमोर ओरडली.

बिल्डिंगच्या लिफ्टपर्यंत पापाराझींनी पाठलाग केल्याने आलिया संतापली आणि त्यांना म्हणाली, “काय करताय? ही प्रायव्हेट जागा आहे.” तिचा हा व्हिडीओसुद्धा पापाराझींनी शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पापाराझींवर अशा प्रकारे भडकण्याची आलियाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी एका फोटोग्राफरने तिच्या घरासमोरील इमारतीवरून तिचे फोटो क्लिक केले होते. त्यावेळी आलिया तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये होती. अत्यंत खासगी क्षणांचे अशा पद्धतीने नकळत फोटो काढल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mixes Singh (@mi_xes1234)

आलिया आणि रणबीर कपूरने त्यांची मुलगी राहाचेही फोटो सुरुवातीला पापाराझींना काढण्यास मनाई केली होती. “आम्हाला जेव्हा योग्य वाटेल, तेव्हा आम्ही राहाला तुमच्यासमोर आणू”, अशी विनंती त्यांनी केली होती. गेल्या वर्षी कपूर घराण्याच्या ख्रिसमस पार्टीला अखेर रणबीर आणि आलियाने राहाला पापाराझींसमोर आणलं होतं.

आलियाच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास ती ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री गल गडॉटसोबत झळखली होती. ती लवकरच ‘जिगरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती वेदांग रैनासोबत भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत निर्मित होणाऱ्या ‘अलफा’ या चित्रपटासाठी शूटिंग करतेय. आलियाच्या आगामी चित्रपटांच्या यादीत संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’चाही समावेश आहे. यामध्ये ती रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्यासोबत काम करणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;