दोन हजार रुपयांपर्यंतच्या कार्ड पेमेंटवर 18 टक्के जीएसटी? सोमवारी होणार निर्णय

दोन हजार रुपयांपर्यंतच्या कार्ड पेमेंटवर 18 टक्के जीएसटी? सोमवारी होणार निर्णय

शॉपिंगला गेल्यावर जर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करत असाल तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. कारण या क्रेडिट, डेबिट कार्डाच्या दोन हजार रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर सरकार 18 टक्के जीएसटी लावण्याची शक्यता आहे. सोमवारी जीएसटीची बैठक होणार आहे. त्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार बिलडेस्क आणि सीसीअवेन्यु सारख्या पेमेंट अ‍ॅग्रीगेट कंपन्यांवर 18 टक्के जीएसटी लावण्याच्या प्रस्तावार चर्चा करण्याची शक्यता आहे.असे झाल्यास क्रेड़िट आणि डेबिट कार्डच्या दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केल्यास अतिरिक्त जीएसटी ग्राहकांना द्यावा लागणार आहे.

बिलडेस्क आणि सीसीअवेन्यू सारख्या बड्या पेमेंट अ‍ॅग्रीगेटर्संना जीएसटी अधिकाऱ्यांकडून नोटीस मिळाली आहे. दोन हजार रुपयांपर्यंतच्या कमी डिजिटल ट्रान्झेक्शन प्रोसेस करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या शुल्कावर जीएसटी मागण्यात आला आहे. हिंदुस्थानात डिजिटल पेमेंटपैकी 80 टक्के व्यवहार हे दोन हजार रुपयांपेक्षा कमी केले जातात. 2016 साली नोटबंदीच्या वेळी पेमेंट अ‍ॅग्रीगेटर्सवर छोट्या व्यवहारांवर टॅक्स माफ करण्यात आला होता.

जर दोन हजारपर्यत पेमेंटवर जीएसटी लावण्यावर निर्णय झाला तर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरण्याऱ्यांवर याचा मोठा फटका बसणार आहे. पेमेंट अॅग्रीगेटर्स सध्या व्यापाऱ्यांकडून प्रत्येक व्यवहारामागे 0.5 ते 2 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारतं. जर या पेमेंटवर कर लागला तर त्याचा भार ग्राहकांनाच उचलावा लागणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;