उज्जैनमध्ये बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या विकृत नराधमाला अटक

उज्जैनमध्ये बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या विकृत नराधमाला अटक

मध्य प्रदेशमध्ये एका महिलेवर दिवसा ढवळ्या फुटपाथवर बलात्कार झाला होता. तेव्हा उपस्थित काही लोकांनी महिलेला वाचवण्याऐवजी या घटनेचा व्हिडीओ काढला. आता ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

4 सप्टेंबरला उज्जैनच्या कोळसा फाटक भागात एका फुटपाथवर एका महिलेवर बलात्कार झाला होता. या घटनेचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. या प्रकरणी ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला होता, त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव मोहम्हज सलीम असून तो रिक्षा चालक आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला आहे. आरोपीने ज्यांना ज्यांना व्हिडीओ पाठवले होते त्यांचीही माहिती पोलिस जमा करत आहेत.

पीडित महिला ही कचरा वेचणारी होती. तर आरोपी हा फुटपाथवर भाजी विकायचा. आरोपीने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि लग्नाचेही वचन दिलं होतं. त्या दिवशी आरोपी खुप दारू प्यायला होता. नंतर आरोपीने महिलेलाही जबरदस्तीने दारू पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;