Amitabh Rekha Affair: या घटनेनंतर ढसाढसा रडल्या होत्या जया बच्चन

Amitabh Rekha Affair: या घटनेनंतर ढसाढसा रडल्या होत्या जया बच्चन

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा आजही सुरु असतात. दोघेही बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारे कलाकार आहेत.  पण ही बातमी पहिल्यांदा कशी लीक झाली हे फारच कमी लोकांना माहित आहे. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची सुरुवात 1976 मध्ये ‘दो अंजाने’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. लग्नानंतर जया बच्चन आणि अमिताभ बच्चन सुखी जीवन जगत होते, मात्र अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात रेखा आल्यानंतर सर्व काही बदलले होते. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरची सुरुवातीला कोणालाच माहिती नव्हती. रेखाच्या एका मैत्रिणीच्या बंगल्यावर दोघेही अनेकदा भेटत असत.

पहिली बातमी कशी लीक झाली?

एक दिवस अचानक रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची बातमी समोर आली. रिपोर्ट्सनुसार, एका चित्रपटाच्या सेटवर असे काही घडले होते. ज्याने सगळ्यांना ही शंका आली. लव्ह ट्रँगल सर्वांसमोर आला. त्या काळात लोकप्रिय मासिके आणि गॉसिप कॉलम्सने ही बातमी उचलून धरली आणि हे प्रकरण माध्यमांमध्ये झळकले.

जया बच्चन यांनीच रेखा यांची अमिताभ बच्चन यांना ओळख करून दिली होती. जया बच्चन आणि रेखा या लग्नापूर्वी चांगल्या मैत्रिणी होत्या. रेखा जया यांना दीदीभाई म्हणायची. जया यांनीच रेखाची यांची अमिताभ यांना ओळख करून दिली. पण जेव्हा अफेअरची बातमी समोर आली तेव्हा हे नातं खूपच गुंतागुंतीचं झालं होतं.

रेखा यांना जेवणासाठई आमंत्रण

जया बच्चन यांनी रेखाला एका दिवशी रात्री जेवणासाठी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांनी आपण अमिताभ यांना कधीही सोडणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. असा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला होता. या घटनेनंतर रेखा आणि अमिताभ यांच्या नात्यावर चर्चा सुरु झाल्या होत्या. दोघंही याविषयी कधीच उघडपणे बोलले नाही. पण रेखा यांनी अनेक मुलाखतींमध्ये या नात्याबद्दल नक्कीच संकेत दिले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;