Nagar News – घाटात ब्रेक फेल झाला, भरधाव कंटेनरची कामगाराला चिरडत चार वाहनांना धडक

Nagar News – घाटात ब्रेक फेल झाला, भरधाव कंटेनरची कामगाराला चिरडत चार वाहनांना धडक

इमामपूर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव कंटेनरने आधी कामगाराला चिरडले. मग चार वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रामदास पवार असे मयत कामगाराचे नाव आहे. पवार रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करायचा.

छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरचे पांढरी पुलाजवळील इमामपूर घाटात ब्रेक फेल झाले. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर अनियंत्रित कंटेनरने आधी रामदास पवार यांना चिरडले. त्यानंतर दोन दुचाकी, एक टेम्पो आणि एक हार्वेस्टर अशा चार वाहनांना धडक दिली. या धडकेत चार वाहनांतील सहा जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे.

वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनर पांढरी पुलाजवळ जाऊन थांबला. त्यानंतर कंटेनर चालकाने वाहन तेथेच सोडून धूम ठोकली. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;