दिल्लीत वरळी हिट अँड रनची पुनरावृत्ती; आधी धडक दिली, मग 10 किमी फरफटत नेले

दिल्लीत वरळी हिट अँड रनची पुनरावृत्ती; आधी धडक दिली, मग 10 किमी फरफटत नेले

दिल्लीत हिट अँड रनची भयंकर घटना समोर आली आहे. कनॉट प्लस परिसरात भरधाव कारने एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. त्यानंतर कारने सुमारे 10 किलोमीटर अंतर त्या व्यक्तीला फरफटत नेले. या अपघातात सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर कारचालकाने तेथून पळ काढला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारचा शोध घेत आरोपीला अटक केली. शिवम दुबे असे आरोपी चालकाचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे.

शिवम मित्राची कार घेऊन कनॉट प्लेस येथे गेला होता. त्याचवेळी रस्ता ओलांडणाऱ्या लेखराजला कारने धडक दिली. यावेळी लेखराज कारच्या चाकात अडकला. मात्र शिवमने कार न थांबवता तसेच लेखराजला 10 किमी फरफटत नेले. यानंतर लेखराजला रस्त्यावर सोडून शिवमने पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लेखराजला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत कारचा शोध लावला. यानंतर शिवमला अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;