मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जण ठार

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जण ठार

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. राज्यातील जिरीबाममध्ये शनिवारी सकाळी सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एका व्यक्तीची झोपेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर दोन प्रतिस्पर्धी सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात अन्य 4 जण ठार झाल्याचे पलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 5 किमी अंतरावर एका निर्जन ठिकाणी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीवर झोपेत असताना गोळ्या झाडल्या. या हत्येनंतर जिल्हा मुख्यालयापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;