Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने निक्कीला झापलं, दिली सर्वात मोठी शिक्षा.. ; खडसावत म्हणाला – संपूर्ण सीझन कॅप्टन्सी..

Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने निक्कीला झापलं, दिली सर्वात मोठी शिक्षा.. ; खडसावत म्हणाला – संपूर्ण सीझन कॅप्टन्सी..

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या बराच गाजत असून या शोमध्ये निक्की तांबोळी बरीच चर्चेत असते. पहिल्या दिवसापासूनच तिचे काही ना काही उद्योग सुरू असतात. आधी तिने वर्षा उसगांवकरांचा अपमान केला, नंतर अजून काही राडे… मात्र त्यावर घरातल्या सदस्यांनी देखील वेळोवळी योग्य स्टँड घेऊन तिला खडसावलं. पण तरीही निक्कीचे उद्योग काही थांबत नाहीत. आता ‘भाऊच्या धक्क्यावर’ रितेश देशमुखने निक्कीला चांगलंच झापत तिची कानउघडणी केल्याचं पहायला मिळालं. आज रितेश देशमुख ‘गणपती विशेष भाऊचा धक्का’ घेणार आहे. त्यामध्ये त्याने निक्कीला थेट सुनावलं.

आठवडाभर घरात केलेली चुकीची वक्तव्य, उगाच वाद घालणं, घरातलं कोणतंही काम करण्यास दिलेला नकार या निक्कीच्या वागण्यामुळे प्रेक्षक चांगलेच संतापले होते. आता रितेश देशमुख यानेही तिला यावरून खडेबोल सुनावत तिची खरडपट्टी काढली. “कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही… अशा प्रकारची तुमची दादागिरी मी खपवून घेणार नाही” असं म्हणत रितेशने निक्कील मोठी शिक्षा देत चांगलीच अद्दल घडवली आहे.

निक्कीला सर्वात मोठी शिक्षा

भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला झापलं. तो म्हणाला, ‘दरवेळेस तुम्हाला इतरांचा बाप काढायचा असतो. आता बिग बॉस मराठीच्या संपूर्ण सीझनमध्ये तुम्हाला कॅप्टन होता येणार नाही, हीच तुमची शिक्षा ‘ असं म्हणत रितेशने तिला शिक्षा सुनावलीये. कॅप्टन्सीच्या शर्यतीतून निक्कीला बाद करण्यात आल्याने तिला मोठा धक्का बसला. कॅप्टन्सी मिळणार नसल्याने तिला इम्युनिटीलाही मुकावं लागणार आहे.

निक्कीला मिळणार आणखी शिक्षा ?

एवढंच नव्हे तर निक्कीला आणखी एक शिक्षा मिळू शकते. प्रोमोमध्ये रितेश निक्कीला हातवारे करून उठा सांगतो आणि तिला बाजूला एक लहानसा टेबल देण्यात येतं. त्यावरून रितेश देशमुख निक्कीला भाऊच्या धक्क्यावरून उठवणार असल्याची सध्या सुरू आहे. त्याचा उलगडा आजच्या भागात होईल. “निक्की ही तुमची जागा… मी गेल्या आठवड्यात तुमचं कौतुक केलं. कधीपण कौतुक मनात ठेवायचं असतं, कारण, कौतुक जेव्हा डोक्यात जातं तेव्हा त्याची हवा होते.. आणि एकदा डोक्यात हवा गेली की, आपला स्वत:वरचा कंट्रोल सुटतो. आपल्यात माज येतो आणि आपणं वाट्टेल तसं वागतो, वाटेल तसं बोलतो. या आठवड्यात निक्की तुम्ही तेच केलं.” असं म्हणत रितेशने तिला आठवड्याभरातील तिच्या कृत्यांची आठवण करून देत तिची खरडपट्टी काढली.

रितेशनच्या या कृतीनंतर नेटकऱ्यांनी आणि प्रेक्षकांनी मात्र त्याचं चांगलचं कौतुक केलं आहे. निक्कीला त्याने झापल्यामुळे अनेकांना आनंद झाला असून विविध कमेंट्स करत युजर्सनी रितेशला सपोर्ट केलाय तर निक्कीलाही चार बोल सुनावलेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;