अंकिता लोखंडे हिने ‘या’ मोठ्या कारणामुळे मागितली महिलेची माफी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले…

अंकिता लोखंडे हिने ‘या’ मोठ्या कारणामुळे मागितली महिलेची माफी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले…

अंकिता लोखंडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉसच्या घरात धमाल करताना दिसली. यावेळी अनेकांनी थेट अंकिता लोखंडेच्या सासूबाईलाच खडेबोल सुनावले. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अंकिता लोखंडे ही प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगताना दिसली. तसा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला. अली गोनी याने म्हटले की, लवकरच छोटा जैन येणार आहे. अली गोनी याचे बोलणे ऐकून लाजताना विकी जैन हा दिसला होता. ज्यानंतर अंकिता लोखंडे ही प्रेग्नंट असल्याचे सांगितले जात होते.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बॉसनंतर लाफ्टर शेफमध्ये धमाका करताना दिसले. विशेष म्हणजे यांची जोडी देखील प्रेक्षकांना आवडताना दिसली. सध्या अंकिता लोखंडे हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. अंकिताच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

अंकिता लोखंडे ही मार्केटमध्ये दिसत आहे. अंकिता लोखंडे हिचे फोटो आणि व्हिडीओ घेण्यासाठी पापाराझी यांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. मात्र, यावेळी एक महिला ही चांगलीच चिडल्याचे दिसत आहे. ती महिला मोठ्याने बोलताना दिसली. धक्का लागल्याचे त्या महिलेचे म्हणणे होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सुरूवातीला अंकिता लोखंडे हिने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्या महिलेचा वाढलेला आवाज पाहताच अंकिता लोखंडे ही परत वापस आली आणि ती माफी मागताना दिसली. ठिक आहे… काही नाही मी माफी मागते असेही म्हणताना अंकिता लोखंडे ही यावेळी दिसली. आता अंकिताचा हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे ही चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळताना दिसली आहे. आता अंकिता लोखंडे हिचा हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. लोक म्हणाले की, अंकिता लोखंडेला मानले पाहिजे राव. दुसऱ्याने लिहिले की, लेडी बॉस दिसत आहे अंकिता. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करून अंकिता लोखंडे हिचे काैतुक केल्याचे बघायला मिळतंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;