Hit & Run – मुंबईत गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बीएमडब्लूने चिरडले, एकाचा मृत्यू; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

Hit & Run – मुंबईत गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बीएमडब्लूने चिरडले, एकाचा मृत्यू; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम व चैतन्यमय वातावरण असताना मुलुंडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत पुन्हा हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. मुलुंडमध्ये पहाटे रस्त्यावर बॅनर लावत असताना गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना भरधाव बीएमडब्लूने चिरडले. यात एका कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. जखमी कार्यकर्त्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मुलुंडचा राजा अशी ओळख असलेल्या गणेश मंडळाचे कार्यकर्ते प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे पहाटे 4 वाजता बॅनर लावत होते. याचदरम्यान कॅम्पस हॉटेलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्लूने त्यांना धडक दिली. घटनेनंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

अपघात इतका भीषण होता की यात प्रीतम थोरात याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रसाद पाटील हा जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फरार चालकाचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;