महिलेने ‘या’ प्रकारे हात लावताच अस्वस्थ झाला अक्षय कुमार, व्हिडीओ व्हायरल, लोकांचा चढला पारा, थेट म्हणाले, बाईला…

महिलेने ‘या’ प्रकारे हात लावताच अस्वस्थ झाला अक्षय कुमार, व्हिडीओ व्हायरल, लोकांचा चढला पारा, थेट म्हणाले, बाईला…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अक्षय कुमारचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेंव असा अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट रिलीज होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना अक्षय दिसतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये. अक्षयच्या चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत. अक्षय कुमार हा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो.

अक्षय कुमार याचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार जबरदस्त अशा लूकमध्ये दिसतोय. मात्र, या व्हिडीओमध्ये पुढे असे काही घडले की, अक्षय कुमार हा रागात आपल्या गाडीमध्ये जाऊन बसताना दिसतोय. अक्षयचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसतोय.

त्याचे झाले असे की, अक्षय कुमार हा बाहेर पडत असताना चाहत्यांनी त्याचा भोवती मोठा गोंधळ फोटोसाठी केला. विशेष म्हणजे यावेळी अक्षय कुमार देखील आपल्या चाहत्यांसोबत सेल्फीसाठी पोझ देताना दिसला. मात्र, यावेळी एक महिला तिथे अक्षयसोबत फोटो काढण्यासाठी पोहोचली. त्या महिलेचे वागणे पाहून अक्षयही हैराण होताना दिसला.

अक्षय कुमार याच्या छातीवर अगोदर त्या महिलेने हात ठेवला. त्यानंतर तिने चक्क अक्षय कुमार याच्या पोटावर हात ठेवून फोटो काढला. महिलेचे हे वागणे अक्षय कुमार याला अजिबातच आवडलेले नसल्याचे दिसले. मात्र, त्यावेळी तो काहीच बोलला नाही. अक्षय कुमार याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलून गेले. अक्षय रागाने बघताना दिसला.  पुढे काहीही न बोलता आणि फोटोसाठी न थांबता थेट आपल्या गाडीमध्ये जाऊन बसला.

आता अक्षयचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अक्षयच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. एकाने लिहिले की, या बाईला असे करण्याची काही गरज होती का? दुसऱ्याने लिहिले की, मुर्खपणा आहे त्या महिलेचा. तिसऱ्याने लिहिले की, अक्षयला या महिलेचे वागणे अजिबताच आवडले नसल्याचे दिसत आहे. लोक व्हिडीओवर कमेंट करून त्या महिलेला सतत खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;