एक्स-गर्लफ्रेंडची फसवणूक, जबरदस्तीने गर्भपात! प्रसिद्ध अभिनेत्यावर चार्जशीट दाखल

एक्स-गर्लफ्रेंडची फसवणूक, जबरदस्तीने गर्भपात! प्रसिद्ध अभिनेत्यावर चार्जशीट दाखल

झगमगत्या विश्वातून अनेक चांगल्या – वाईट गोष्टी समोर येत असतात. ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना अनेक धक्कादायक गोष्टींचा सामना करावा लगतो. स्वतःची ओळख निर्माण करत असताना, अनेक अभिनेत्रींची फसवणूक झाली आहे. ज्यामुळे अभिनेत्रींचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. दरम्यान, इंडस्ट्रीतील पुरुषांविरोधात अनेक महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. नुकताच, एका प्रसिद्ध अभिनेत्यावर त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडने धक्कादायक आरोप केले आहे. ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. लग्नाचं आमिष दाखवत 11 वर्ष फसवणूक केल्याचा आरोप अभिनेत्याच्या एक्स-गर्लफ्रेंडने केला आहे.

तेलुगू अभिनेता राज तरुणवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने फसवणूक केल्याचा आरोप केला. अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडचं नाव लावण्या असं आहे. लावण्याने दावा केला होता की, राज तरुणने लग्नाच्या बहाण्याने तिला अडकवलं आणि 11 वर्षांच्या नात्यात फसवणूक केली. आता याप्रकरणी नरसिंगी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

रिपोर्टनुसार, लावण्याने अभिनेता राज तरुण याच्यावरील आरोपांशी संबंधित सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. त्याआधारे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. लावण्यने राज तरुणवर जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोपही केला होता.

याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये लावण्या हिने मेडिकल रिपोर्ट्स आहे. ज्यामध्ये तिचा गर्भपात झाल्याचं देखील आढळून आलं. लावण्या हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतान राज तरुण को-स्टार मालवी मल्होत्रा हिच्यासोबत देखील रिलेशनशिपमध्ये असल्याचे पुरावे लावण्या हिने पोलिसांना दिले आहेत.

राज तरुणवरील गंभीर आरोप…

लावण्या आणि राज तरुण याचं लग्न झाल्याचं दावा देखील करण्यात आला आहे. तर मानवी मल्होत्रा आणि तिच्या भावाने लावण्या हिने धमकावल्याची माहिती देखील समोर आली आहे. ज्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, राज तरुणने हे सर्व आरोप फेटाळून लावत लावण्यला ड्रग्जचे व्यसन असल्याचे सांगितलं होतं. या सगळ्यात ऑगस्टमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाने राज तरुण यांना अटींसह जामीन मंजूर केला.

एका मुलाखतीत लावण्या म्हणाली, ‘आम्ही विवाहित आहोत ही गोष्ट आमच्या कुटुंबियांना माहिती आहे. गेल्या सप्टेंबरपासून तो नातं संपण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही एकमेकांना ओळखून 15 वर्षे झाली, त्यापैकी 11 वर्षे आम्ही एकत्र आहोत. मला त्याचे पैसे नको आहेत, त्याच्याकडे पैसै असण्याआधीच मी त्याला ओळखत होतो. मालवी हे मान्य करणार नाही, पण त्यांचे अफेअर आहे. त्याने मला तिच्यासाठी सोडलं आहे.’ सध्या सर्वत्र लावण्या आणि राज तरुण यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;