करीना कपूर हिने ‘ही’ अट ठेवताच दिग्दर्शकाने दाखवला चित्रपटातून बाहेरचा रस्ता, मोठा खुलासा, अभिनेत्री एक वर्ष…

करीना कपूर हिने ‘ही’ अट ठेवताच दिग्दर्शकाने दाखवला चित्रपटातून बाहेरचा रस्ता, मोठा खुलासा, अभिनेत्री एक वर्ष…

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीचे चित्रपट सतत प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. तिचे हे चित्रपट धमाके करत आहेत. करीना कपूरचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आमिर खान आणि करीना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले. मात्र, तरीही या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लॉप गेला. दुसरीकडे हा चित्रपट फ्लॉप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. नुकताच आता एक अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय.

शाहरुख खान आणि करीना कपूर यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. आता शाहरुख खान आणि करीना कपूर यांच्याबद्दल मोठा खुलासा आलाय. ‘कल हो ना हो’ या चित्रपटात शाहरुख खान आणि करीना कपूर हे स्क्रीन शेअर करताना दिसणार होते. मात्र, ते होऊ शकले नाही. कारण करीना कपूर हिने एक मोठी अट ठेवली होती.

करण जोहर याने कल हो ना हो चित्रपटासाठी शाहरुख खान याच्यासोबत करीना कपूरला कास्ट केले. मात्र, करीना कपूर हिने शाहरुख खान याच्या इतकीच फीस चित्रपटासाठी मागितली. कारण दोघेही चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने तिला शाहरुख खान याच्या इतकीच फीस हवी होती. मात्र, चित्रपटाचे बजेट कमी असल्याने करण जोहर याने करीनाला त्या चित्रपटासाठी कास्ट केले नाही.

करण जोहर याने या चित्रपटासाठी शाहरुख खान याच्यासोबत सैफ अली खान आणि प्रीति झिंटा यांना कास्ट केले. या गोष्टीनंतर करीना कपूर करण जोहरवर इतकी जास्त नाराज झाली की, तिने एक वर्ष अजिबात करण जोहरला बोलली नाही. कल हो ना हो चित्रपट 30 कोटींमध्ये तयार झाला आणि या चित्रपटाने 86 कोटींची कमाई केली.

विशेष म्हणजे कल हो ना हो चित्रपट 2004 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला. करण जोहर याच्याकडून खुलासा करण्यात आला की, करीना कपूर हिने अभिनेत्या इतके पैसे मागितले होते जे देणे अजिबातच शक्य नव्हते. आता करण जोहर आणि करीना कपूर हे खूप चांगले मित्र आहेत. करण जोहर हा कायमच आपल्या शोमध्ये मोठे खुलासे करताना दिसतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;