राज्यात गुंतवणूक वाढल्याचा दावा करता, तर मग बेरोजगारी का वाढत आहे? काँग्रेसचा महायुती सरकारला सवाल

राज्यात गुंतवणूक वाढल्याचा दावा करता, तर मग बेरोजगारी का वाढत आहे? काँग्रेसचा महायुती सरकारला सवाल

राज्यात महाविकास आघाडीसाठी अनुकुल वातावरण आहे. जनतेचा महायुती सरकारवर प्रचंड रोष आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता आहे. त्यामुळे भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होईल, असा विश्वास काँग्रेसचे राज्यातील प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. हत्या, दरोडे, महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. पुण्यात तीन दिवसात दोन हत्या करण्यात आल्या. महागाई आवाक्याबाहेर गेल्याने सण साजरे करणे अवघड झाले आहे. जनता प्रचंड त्रस्त आहे पण महायुती सरकार मात्र घोटाळे करून पैसे वसुल करण्यात व्यस्त आहे. असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

राज्यात गुंतवणूक वाढली असा देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे तर मग राज्यात बेरोजगारी का वाढत आहे? बेकारी कमी का होत नाही? याची उत्तरे फडणवीस यांनी द्यावीत. भाजप आणि फडणवीस सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. मराठवाडा व विदर्भात पुराने थैमान घातले असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राकडे लक्ष देत नाही. महाराष्ट्रात मात्र अद्याप केंद्राचे पथकही आले नाही. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अजून मदत का मिळत नाही? महायुतीचे नेते केंद्राकडे मदत का मागत नाहीत? असा सवाल पटोले यांनी विचारले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;