महायुतीत महातणाव, गुलाबराव म्हणाले अर्थखाते नालायक

महायुतीत महातणाव, गुलाबराव म्हणाले अर्थखाते नालायक

मिंधे सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज महायुती सरकारला घरचा अहेर दिला आहे. अर्थखात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही. दहावेळा फाईलवर ‘निगेटिव्ह रिमार्क’ यायचा, अशा शब्दांत अर्थखात्याचे जाहीर वाभाडे काढले.

जळगावमध्ये आयोजित एका सत्कार सोहळ्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी सरकारवरच निशाणा साधला. आमची फाईल दहा वेळा अर्थखात्याकडे गेली, पण या खात्याकडून ही फाईल माघारी पाठवण्यात आली.

आपण स्वतःच सरकारमधील मंत्री आहोत आणि सरकारवर टीका करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी सारवासारव सुरू केली. खरं तर मी असं म्हणायला नको होतं. टीव्हीवाले आणि पत्रकारांची मी आधीच माफी मागतो. त्यांनी ही बातमी दाखवली नाही तर बरं होईल, पण अर्थखात्यासारखे नालायक खाते नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;