गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन

ज्याची भक्तगण आतुरतेने वाट बघतात तो बाप्पा अखेर सर्वांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे दहा दिवस गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम असणार. हा सण सर्वांना भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करता यावा, कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी मुंबई पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

गणेशोत्सवात लाखो भक्त शहरातील विविध ठिकाणी विराजमान झालेल्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडतात. मोठय़ा संख्येने नागरिक येत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनीदेखील आवश्यक त्या सुविधा केल्या आहेत. शहरात 15 हजार पोलिसांचा फौजफाटा  नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात येणार आहे. त्यात 32 उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2435 पोलीस अधिकारी, 12 हजार 420 अंमलदार असणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट तसेच होमगार्डदेखील बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.

दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी संयम दाखवून पोलिसांना सहकार्य करावे, बेवारस वस्तू आढळल्यास त्याची पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून गणेशोत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पालिका यंत्रणाही सज्ज

मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली असून आगमन-विसर्जनासाठी रस्त्यांची डागडुजी, विसर्जनासाठी 240 कृत्रिम तलाव तैनात करण्यात आले असून शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात एकूण 69 नैसर्गिक तलावांच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाटय़ांवरही गणेश विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शिवाय विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्थळे, तसेच गणेशमूर्ती संकलन पेंद्रे आदी सुविधा असतील अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;