नातू रडणं थांबवत नव्हता, संतापलेल्या आजीने चावे घेत बेदम मारले; उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू

नातू रडणं थांबवत नव्हता, संतापलेल्या आजीने चावे घेत बेदम मारले; उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू

नातवंड म्हणजे आजी-आजोबांसाठी जीव की प्राण असतात. पण गुजरातमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सततच्या रडण्याला कंटाळून आजीने नातवासोबत जे केलं ते पाहून सर्वजण चक्रावून गेले. एक वर्षाचा नातू रडणं थांबवत नव्हता. यामुळे संतापलेल्या आजीने नातवाला सर्वांगावर दातांनी चावा घेतला. इतक्यावर तिचे समाधान झाले नाही म्हणून तिने चिमुकल्याला बेदम मारहाण केली.

आजीच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी कुलशन सैयद या महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;