Hathras Accident – तेराव्याहून परतत असताना मिनी ट्रकला बसची धडक, 12 जणांचा जागीच मृत्यू

Hathras Accident – तेराव्याहून परतत असताना मिनी ट्रकला बसची धडक, 12 जणांचा जागीच मृत्यू

तेरावं गावी परतत असताना भरधाव बसने मिनी ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात आग्रा-अलीगड बायपासवर शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

मॅक्स लोडरमध्ये एकूण 30 जण होते. हे सर्व खंदौलीतील सेवला गावचे रहिवासी असून मुकुंद खेडा येथे तेराव्यासाठी गेले होते. तेराव्याचा कार्यक्रम आटोपून गावी परतत असतानाच आग्रा-अलिगड बायपासवर ही घटना घडली. मृतांची आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना हायर सेंटर येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल, जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार, सीओ हिमांशू माथूर पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बस चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;