Ganeshotsav 2024 – मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचे हाल

Ganeshotsav 2024 – मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचे हाल

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमानी वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडपासून ट्रॅफिक जाम झाल्याने तासनतास प्रवाशी एकाच ठिकाणी अडकले आहेत. तीन तासात गाडी अर्धा किमी सुद्धा पुढे सरकत नसल्याने कोलाड ते इंदापूरमध्ये चाकरमानी अडकले आहेत.

गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपल्याने गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना घराचे वेध लागले आहेत. मात्र रस्त्यावरील खड्डे आणि वाहनांच्या लांबलचक रांगा यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कोलाडपासून जवळपास दीड-दोन तास गाड्या पुढे सरकतच नाहीत. यामुळे लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना नाहक त्रास होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;