जुन्या महानगरपालिकेत आयुक्तांची अचानक झाडाझडती; अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, नागरिकांशी साधला संवाद

जुन्या महानगरपालिकेत आयुक्तांची अचानक झाडाझडती; अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, नागरिकांशी साधला संवाद

महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी सकाळी जुन्या महानगरपालिकेत अचानक भेट देऊन तपासणी केली. जन्म मृत्यू नोंदणी विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने त्यांनी या विभागात झाडाझडती घेतली. यात मोठा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला. अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे आढळून आल्याने आयुक्त यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना चांगलेच फैलावर घेतले. या विभागात कामकाजाचे कोणतेही नियोजन नसल्याने त्यांनी जाब विचारला. नागरिकांचे अर्ज तत्काळ मार्गी लावा, असे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी दिले.

जुन्या महानगरपालिकेत जन्म मृत्यू नोंदणी विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने आयुक्त डांगे यांनी शुक्रवारी अचानक या विभागात भेट दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. काही कर्मचारी जागेवर उपस्थित नव्हते. काही नागरीक दाखल्यांच्या प्रतीक्षेत होते. आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांशी संवाद साधून तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनाही त्यांनी खडेबोल सुनावले. नागरिकांना वेळेत सुविधा देण्याच्या दृष्टीने नियोजन करा, अर्ज प्रलंबित ठेऊ नका, कामकाजात सुधारणा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. कामकाजात सुधारणा न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, महानगरपालिकेने चारही प्रभाग समिती कार्यालयामार्फत जन्म मृत्यू नोंदणी व दाखले वितरण सुरू केले आहे. यापुढे त्या त्या प्रभाग समितीच्या हद्दीतील नागरिकांनी संबंधित प्रभाग कार्यालयातच अर्ज करावेत व शुल्कही तेथेच भरावे. जुन्या महापालिकेत फक्त तेथील प्रभाग समिती कार्यालयाच्या क्षेत्रातील नागरिकांनाच दाखले मिळतील. त्यामुळे नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी न करता आपापल्या प्रभाग समिती कार्यालयात अर्ज करून दाखले घ्यावेत, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;