Kenya School Fire – केनियात शाळेच्या हॉस्टेलमध्ये अग्नीतांडव, 17 विद्यार्थी होरपळून मृत्यू; 14 जखमी

Kenya School Fire – केनियात शाळेच्या हॉस्टेलमध्ये अग्नीतांडव, 17 विद्यार्थी होरपळून मृत्यू; 14 जखमी

केनियातील एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हॉस्टेलमधील 17 विद्यार्थी होरपळले असून 14 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे वृत्त कळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरवात केली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

केनियातील न्येरी काऊंटी येथील हिलसाइड एंडराशा अकादमीमध्ये ही घटना घडली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आगीच्या घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेत कुणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;