कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांची राजकीय आखाड्यात एन्ट्री; काँग्रेसमध्ये प्रवेश

कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांची राजकीय आखाड्यात एन्ट्री; काँग्रेसमध्ये प्रवेश

हिंदुस्थानची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी हरयाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. देशसेवेसाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे विनेश फोगाट म्हणाली.

आम्ही जेव्हा जंतर-मंतरवर आंदोलन करत होते. तेव्हा भाजपने आम्हाला तुच्छ समजले होते. हे सिद्ध करण्यासाठी भाजपच्या आयटी सेलने अनेक प्रयत्न केले. मात्र, ऑलिम्पिकमध्ये आम्ही सिद्ध करून दाखवले, असे विनेश फोगाटने यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी विनेशने भाजपवर टिकास्त्र सोडले. ती पुढे म्हणाली की, आम्ही आता अशा पक्षामध्ये आलो आहोत जो पक्ष रस्त्यापासून ते संसदेपर्यंत महिलांच्या सन्मानासाठी लढतोय. आज आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. खेळाडू म्हणून आम्हाला ज्या गोष्टींचा सामना करावा लागला, तशी वेळ कोणावरही येऊ नये. आमची लढाई आजही सुरू आहे. मी नेहमी तुमच्या सोबत आहे, असा विश्वास यावेळी विनेश फोगाटने व्यक्त केला.

बजरंग पुनियानेही भाजपवर टीका केली. तो म्हणाला की, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आम्ही भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र कोणीही आले नाही. यावेळी सर्व विरोधी पक्ष आमच्या सोबत उभे राहिले. फक्त भाजप आमच्या विरोधात होता. आम्ही आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे मेहनत करून काँग्रेसला अजून मजबूत करू. दरम्यान, राहुल गांधी यांची भेट घेतल्यामुळे विनेश आणि बजरंग पुनिया यांना रेल्वेकडून नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र दोघांनीही न डगमगता थेट नोकरीचा राजीनामा दिला. तसेच संपूर्ण देश या दोन खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे काँग्रेस सरचिटणीस वेणुगापोल यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;