Ganpati Bappa Morya : दुपारी 1.50 वाजेपर्यंत गणरायाची प्राणप्रतिष्ठा

Ganpati Bappa Morya : दुपारी 1.50 वाजेपर्यंत गणरायाची प्राणप्रतिष्ठा

सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत गणरायाचे आगमन शनिवारी, 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. शनिवारी दुपारी 1.50 पर्यंत गणेशमूर्ती पूजनाचा मुहूर्त असून याआधी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करावे, असे पंचागकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. पुढच्या वर्षी गणरायाचे आगमन लवकर होणार आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीपेक्षा 10 दिवस बाप्पा लवकर येतील.

7 सप्टेंबर रोजी, श्रीगणेश चतुर्थीला मध्यान्हकाली पार्थिव गणेश पूजन करावयाचे आहे. या दिवशी सकाळी 11.22 पासून दुपारी 1. 50 पर्यंत मध्यान्हकाल आहे. या वेळेत पार्थिव गणेशमूर्ती पूजन करावे. ज्यांना या वेळेत गणेशमूर्ती पूजा करता येणे शक्य नसेल त्यानी प्रातःकालपासून म्हणजेच पहाटे 4 वाजल्यापासून दुपारी मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे दुपारी 1.50 पर्यंत श्रीगणेश पूजन करावे, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. पृ. सोमण यांनी सांगितले.

n यावर्षी मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी रात्री 8.02 वाजेपर्यंत ज्येष्ठा गौरी आणाव्यात. बुधवार 11 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन करावे आणि गुरुवार 12 सप्टेंबर रोजी रात्री 9.51 पर्यंत ज्येष्ठा गौरी विसर्जन करावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;