प्रेग्नंट असल्याचे कळताच पहिला फोन कपिल शर्माच्या पत्नीला, भारती सिंहकडून मोठा खुलासा, म्हणाली, रात्रभर दारू आणि

प्रेग्नंट असल्याचे कळताच पहिला फोन कपिल शर्माच्या पत्नीला, भारती सिंहकडून मोठा खुलासा, म्हणाली, रात्रभर दारू आणि

कॉमेडियन भारती सिंह हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. भारती सिंह ही सोशल मीडियावर सक्रिय असते. व्लॉगच्या माध्यमातून भारती सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. भारती सिंह ही लाफ्टर शेफमध्ये दिसली. भारती सिंह हिने 2017 मध्ये हर्ष लिंबाचिया याच्यासोबत लग्न केले. भारती सिंह हिचा मुलगा लक्ष अर्थात गोला नेहमीच चर्चेत असतो. व्लॉगच्या माध्यमातून गोलाबद्दल सर्व अपडेट मिळतात. काही दिवसांपूर्वीच हे कर्जतला धमाल करताना दिसेल होते. भारती सिंह ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.

नुकताच भारती सिंह हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये भारती सिंह हिच्याकडून मोठे खुलासे करण्यात आले. भारती सिंह हिने तिच्या प्रेग्नंसीबद्दल खुलासा केलाय. भारती सिंह म्हणाली की, मी पार्टी करत होते…मी बियर पित बसले होते…त्यावेळी मला एक प्रेग्नंसी टेस्ट किट दिसली मी ती किट माझ्याकडे ठेवली आणि रात्रभर पार्टी करून झोपले.

सकाळी उठून मी टेस्ट केली आणि परत झोपले. माझ्या लक्षात देखील नव्हते की, मी टेस्ट केली. मी नंतर बघितले तर माझी प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली. मला काहीच सुचत नव्हते. मी सर्वात अगोदर कपिल शर्माच्या पत्नीला फोन केला, मी त्यांना सर्व गोष्ट सांगितली. कारण मी सकाळी टेस्ट केली आणि त्याच रात्री मी दारू पित बसले होते.

त्यानंतर मी डॉक्टरांना फोन केला. त्यांनी मला काही टेस्ट करण्यास सांगितल्या. डॉक्टरांनी मला सांगितले की, मी सात आठवड्यांची प्रेग्नंट आहे. मला त्यावेळी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, झाले ते झाले आता दारू वगैरे प्यायची नाही. मात्र, मला काही गोष्टींची खरोखरच त्यावेळी खूप जास्त भिती वाटली होती.

माझ्या प्रेग्नंसीमध्ये हर्षने माझी खूप जास्त काळजी घेतली. मी प्रेग्नंसीमध्ये सतत काम केले. मुळात म्हणजे तुमचा पती ज्यावेळी म्हणतो ना…तू कर काम मी तुझ्यासोबत आहे तर एक वेगळीच ताकद नक्कीच मिळते. हर्षने तिच ताकद मला देखील दिली. कारण जेंव्हा पती म्हणतो ना बाळाला काही झाले तर तुच जबाबदार आहेस तर एक महिला म्हणावे तसे काम प्रेग्नंसीमध्ये करू शकत नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;