Maratha Reservation – मराठा आरक्षणाच्या सुनावणीत सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची एन्ट्री

Maratha Reservation – मराठा आरक्षणाच्या सुनावणीत सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची एन्ट्री

>> मंगेश मोरे

मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. या सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयातील पूर्णपीठासोबतच सिंगापूरचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुंदरेश मेननही बसणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

मराठा आरक्षणाची सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. दुपारी अडीच वाजता विशेष पूर्णपीठापुढे होणार मराठा आरक्षणाची सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील पूर्णपीठात न्यायमूर्ती मेनन यांचा अतिथी म्हणून सहभाग असणार आहे. सिंगापूर येथून सरन्यायाधीश मेनन यांच्यासह न्यायमूर्ती रमेश कन्नन, न्यायमूर्ती अँड्रे मणीअम हेसुद्धा उच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. भाऊसाहेब पवार, अ‍ॅड. संजित शुक्ला, जयश्री पाटील यांच्यासह अनुराधा पांडे, सीमा मंधानिया यांच्यातर्फे अ‍ॅड. अश्विन देशपांडे यांनी याचिका दाखल केली आहे.

मराठा आरक्षणाला विरोध तसेच आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या विविध याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती फिरदोष पुनीवाला यांच्या पूर्णपीठापुढे एकत्रित सुनावणी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;