अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, विचित्र अपघाताच 5 जणांनी जीव गमावला

अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, विचित्र अपघाताच 5 जणांनी जीव गमावला

जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. दोन कार आणि एका रिक्षामध्ये झालेल्या विचित्र 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील लखनऊ-महमूदाबाद महामार्गावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

इरफान, वहिदून निशा, अजिज अहमद, ताहिरा बानो आणि साबरीन अशी मृतांची नावे आहेत. तर शायरा बानो, अक्सा आणि कार चालक वरुणा अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. फतेहपूरकडून लखनऊच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने आधी एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर ही कार समोरून येणाऱ्या कारला धडकली आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तलावात पडली. या अपघातामध्ये रिक्षातील 5 जणांचा मृत्यू झाला, 3 गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर तलावामध्ये पडलेल्या कारमध्ये फक्त चालक होता. त्याला वाचवण्यात यश आले आहे. मात्र रिक्षातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.

रिक्षातील लोकं बाराबंकी जिल्ह्यातील कुर्सी भागातील उमरा गावचे रहिवासी होते. ते सर्व जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्याच्या अंत्यसंस्काराला जात होता. मात्र रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;