Pune News – सेल्फीचा नाद जीवावर बेतला, कुंडमळा धबधब्यात दोघे वाहून गेले

Pune News – सेल्फीचा नाद जीवावर बेतला, कुंडमळा धबधब्यात दोघे वाहून गेले

कुंडमळा धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले दोघे सेल्फी घेताना पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहून गेल्याची घटना मावळमध्ये घडली. वाहून गेलेल्यांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. श्रेया सुरेश गावडे आणि रोहन ज्ञानेश्वर ढोंबरे अशी दोघांची नावे आहेत. पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमकडून दोघांचा शोध सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडमधील सहा तरुण आणि दोन तरुणी कुंडमळा येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी श्रेया आणि रोहन हे दोघे मंदिराजवळ उभे राहून सेल्फी काढत होते. मात्र सेल्फी काढताना पाय घसरला आणि दोघेही पाण्यात वाहून गेले.

दोघांना वाहून जाताना पाहून मित्र-मैत्रिणींनी आरडाओरडा सुरू केला. यानंतर आसपासचे लोक गोळा झाले. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. तसेच मावळ येथील वन्यजीव आपदा संस्था आणि तळेगाव एमआयडीसी पोलीसही शोधकार्यात मदत करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;