Latur News – पत्नीला कामावर जाण्यास रोखले म्हणून बॉस भडकला, पतीला गाडीखाली चिरडून ठार केला

Latur News – पत्नीला कामावर जाण्यास रोखले म्हणून बॉस भडकला, पतीला गाडीखाली चिरडून ठार केला

पत्नीला कामावर जाण्यास मनाई केली म्हणून तिच्या बॉसने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. आरोपीला देवणी पोलिसांनी अटक केली आहे. अमोल बिरादार असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला देवणी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

अमोल बिरादार याचे उदयगिरी येथे ड्राईव्हिंग स्कूल आहे. या ड्राईव्हिंग स्कूलमध्ये मयत प्रविणानंद लंके याची पत्नी काम करत होती. प्रविणानंदने पत्नीला तेथे काम करण्यास विरोध केला. यामुळे आरोपीने त्याच्या हत्येचा कट रचला.

आरोपीने मंगळवारी मध्यरात्री आरोपीला आपल्यासोबत वागदरी येथील सप्तगिरी बारमध्ये नेले. तेथे त्याला भरपूर दारू पाजली. मग त्याच्याशी भांडण काढले. नंतर त्याला कारमधून रोडवर उतरवले आणि कारने जोरात त्याला धडक दिली. यात प्रविणानंदचा मृत्यू झाला.

याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात कलम 103 तथा 302 व एक बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल बिरादार यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास येथील पोलीस निरीक्षक माणिकराव डोके, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक कांबळे, नरेश उस्तुर्गे आणि गणेश बुजारे हे करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;