अंगावर उलटी केल्याने आईसमोरच चिमुकल्याला बेदम मारहाण, उपचारापूर्वीच बालकाचा मृत्यू

अंगावर उलटी केल्याने आईसमोरच चिमुकल्याला बेदम मारहाण, उपचारापूर्वीच बालकाचा मृत्यू

अंगावर उलटी केली म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या चार वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बालकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बालकाच्या आईसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. महेश कुंभार असे अटक आरोपीचे नाव आहे. कुंभारवर हत्या आणि गुन्हा लपविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पल्लवी काळे ही महिला गेल्या तीन महिन्यांपासून मुलासह प्रियकर महेश कुंभार याच्यासोबत नाशिक येथे राहत होती. पल्लवीचा चार वर्षाचा मुलगा वेदांशने 1 सप्टेंबर रोजी रात्री जेवणानंतर महेशच्या हातावर उलटी केली. याचा राग येऊन महेशने पल्लवीसमोरच वेदांशला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर वेदांश बेशुद्ध झाला.

महेश आणि पल्लवीने त्याला तात्काळ नाशिक जिल्हा रुगाणालयात नेले. त्यानंतर पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात वेदांशला रेफर करण्यात आले. घरी एकटा असताना वेदांश बेडवरून पडल्याचे पल्लवीने डॉक्टरांना सांगितले. मात्र डॉक्टरांनी वेदांशला तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

डॉक्टरांना वेदांशच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पल्लवीची चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पल्लवीचे शेजारी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली असता तिचे महेश कुंभारसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचे कळले. महेशसोबत ती नाशिक येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पल्लवीकडे खरे बोलण्याशिवाय पर्याय नसल्याने अखेर तिने घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली. यानंतर पंचवटी पोलिसांनी महेश कुंभारच्या नाशिकमधून मुसक्या आवळल्या. पल्लवी आणि महेश विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;