Good News – गणेश चतुर्थी दिवशीही मुंबईत रेल्वे आरक्षण केंद्रे सुरू ठेवणार
चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीही मुंबईतील आरक्षण केंद्रे सुरू ठेवणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. यामुळे येत्या शनिवारी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबई विभागातील आरक्षण केंद्रे सकाळी 8.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरू राहतील.
या दिवशी पीआरएस केंद्रे रविवारच्या पॅटर्नच्या कामकाजाच्या वेळापत्रकाचे पालन करत अर्धा दिवस काम करतील. विशेषतः सर्व पीआरएस केंद्रांची दुसरी शिफ्ट दुपारी 2.00 ते रात्री 10.00 पर्यंत बंद राहील. तथापि, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आपत्कालीन सेवांसाठी पुरेसे काउंटर खुले राहतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List