Yavatmal News – नाल्याच्या आलेल्या पुरात पिकअप वाहन वाहून गेले, सुदैवाने चालक सुखरुप बचावला

Yavatmal News – नाल्याच्या आलेल्या पुरात पिकअप वाहन वाहून गेले, सुदैवाने चालक सुखरुप बचावला

मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने पिकअप वाहन वाहून गेल्याची घटना यवतमाळमध्ये घडली. सुदैवाने वाहन चालक यात सुखरूप बचावला आहे. वणी तालुक्यातील शिंदोला लगतच्या शेवाळा येथे बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

शेवाळावरून सावंगीच्या दिशेने वाहत असलेल्या नाल्यातून पिकअप वाहन मार्गक्रमण करीत होते. नाल्यात वाहन बंद पडले. वाहन चालकाने वाहन सुरू करून नाला पार करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. प्रसंगावधान राखत चालक बाहेर पडला. उपस्थित नागरिकांनी वाहन पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही.

यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. नाल्यांना पूर आल्याने रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;