Nagpur News – कौटुंबिक कारणातून वहिनीला शिवीगाळ, संतापलेल्या लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

Nagpur News – कौटुंबिक कारणातून वहिनीला शिवीगाळ, संतापलेल्या लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

पत्नीला शिवीगाळ केल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. मारहाणीत मोठ्या भावाचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गोविंद चौके असे आरोपीचे तर किसन चौके असे मयताचे नाव आहे.

नागपूर शहरातील हिंगणा भागात चौके कुटुंबीय वास्तव्यास होते. आई, भाऊ आणि भावाचे कुटुंब एकत्र राहत होते. कौटुंबिक वादातून किसनने गोविंदच्या पूर्व पत्नीला शिवीगाळ केली. यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला.

हा वाद टोकाला गेला आणि गोविंदने किसनच्या छातीवर, डोक्यावर अनेक वार केले. यात किसन गंभीर जखमी झाला. किसनला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हिंगणा पोलिसांनी सुरवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र शवविच्छेदन अहवालात गंभीर मारहाणीमुळे किसनचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी गोविंदला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;