सिक्कीममधील पाकयोंगमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 4 जवानांचा मृत्यू
पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील झुलुक येथे जात असतानाच लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला आहे. सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यातील रेशीम मार्गावर गुरूवारी हा अपघात झाला.
रेशीम मार्ग अशी ओळख असलेल्या रेनॉक रोंगली राज्य महामार्गाजवळ दलोपचंद दराजवळील वर्टिकल वीर येथे लष्कराचे वाहन घसरले आणि सुमारे 700 ते 800 फूट दरीत कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रदीप पटेल, डब्ल्यू पीटर, गुरसेव सिंग आणि सुभेदार के थांगापांडी अशी अपघातात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. सर्व लष्करी जवान पश्चिम बंगालमधील बिनागुरी येथील युनिटचे होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List