‘अंगुरी भाभी’ने या अभिनेत्याशी केला होता साखरपुडा; पण लग्नाआधीच..

‘अंगुरी भाभी’ने या अभिनेत्याशी केला होता साखरपुडा; पण लग्नाआधीच..

‘बिग बॉस 11’ची विजेती आणि लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेला तिच्या करिअरमध्ये चांगलंच यश मिळालं. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत तिने साकारलेल्या अंगुरी भाभीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. काही प्रोजेक्ट्सच्या बाबतीत तिचे निर्मात्यांसोबत वादही झाले. सध्या ती ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये झळकतेय. या शोमध्ये अभिनेता करणवीर मेहरासोबत तिची चांगली जोडी जमली आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचीही चर्चा रंगली आहे. शिल्पा सध्या 47 वर्षांची असून अविवाहित आहे. काही वर्षांपूर्वी तिने लग्नाचा निर्णय घेतला होता. एका अभिनेत्यासोबत तिने साखरपुडाही केला होता. 2009 मध्ये शिल्पाने साखरपुडा केला होता. मात्र तिचं हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नव्हतं.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पाने तिचं लग्न मोडण्यामागचं कारण सांगितलं होतं. 2008 मध्ये ‘मायका’ या मालिकेत काम करताना ती सहकलाकार रोमित राजच्या प्रेमात पडली होती. दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. काही काळ डेट केल्यानंतर शिल्पा आणि रोमितने लग्नाचा निर्णय घेतला. त्यापूर्वी दोघांनी साखरपुडाही केला होता. 28 नोव्हेंबर 2009 रोजी हे दोघं लग्न करणार होते. त्यांच्या लग्नपत्रिकाही तयार होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Romiit Raaj (@romitrajprasher)

या मुलाखतीत शिल्पाने असाही खुलासा केला होता की तिच्या आईवडिलांनी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींनी तिला अनेकदा लग्नाचा गंभीरपणे विचार करायला सांगितलं होतं. पण लग्नासाठी वय अजूनही कमी वाटल्याने शिल्पाने विचार करण्यासाठी थोडा वेळ घेतला. आजही माझ्या घरच्यांकडून लग्नासाठी सतत बोललं जातं, असं ती म्हणाली. शिल्पाने साखरपुड्याच्या एक महिन्यानंतर लग्न मोडलं होतं. ‘बिग बॉस 11’मध्ये शिल्पाने स्पष्ट केलं होतं की, तिने रोमितवर खूप प्रेम केलं होतं आणि त्याच्या कुटुंबीयांचाही खूप आदर केला होता. पण ते प्रेम आणि आपुलकी त्याच्या कुटुंबीयांसाठी पुरेशी नव्हती. त्यांनी तिच्याकडे बऱ्याच मागण्या करण्यास सुरुवात केली होती. म्हणून तिने अखेर लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता.

लग्न मोडल्यानंतर जवळपास दोन वर्षांपर्यंत शिल्पाने कोणत्याच प्रोजेक्टमध्ये काम केलं नव्हतं. अखेर 2011 मध्ये तिने ‘चिडिया घर’ या मालिकेतून पुनरागमन केलं. शिल्पाशी लग्न मोडल्यानंतर रोमितने टिना कक्करशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;