ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच, अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबद्दल थेट मोठा खुलासा, अभिनेत्रीला…

ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच, अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबद्दल थेट मोठा खुलासा, अभिनेत्रीला…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अनंत अंबानीच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत विदेशात जाताना स्पॉट झाली. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे विभक्त होणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, त्यावर अभिषेक, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहतेही हैराण झाले आहेत.

नुकताच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन जलसा बंगल्यात जाताना दिसली. यावेळी ऐश्वर्या राय ही चांगलीच रागात दिसत होती. अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्षा बंगला श्वेता बच्चन हिच्या नावावर केल्यानेच वाद सुरू झाल्याचे सांगितले जाते. अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला असून त्यांच्याकडे मोठी संपत्ती आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्याकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनी थेट म्हटले होते की, मी आणि जयाने मिळून एक निर्णय घेतला की, आमच्या संपत्तीचे दोन हिस्से होणार आहेत. प्रत्येक गोष्ट दोन भागांमध्ये वाटली जाईल. संपूर्ण संपत्ती ही अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्यात विभागली जाईल.

लोक म्हणतात की, लग्न झाल्यानंतर मुलीचा काहीच अधिकार नसतो. मात्र, आमच्यासाठी आमचे दोन्ही लेकरं एकसमान आहेत आणि दोघांनाही सर्व संपत्ती मिळणार आहे. मुलगा आणि मुलीमध्ये आम्ही भेदभाव करत नसल्याचेही अमिताभ बच्चन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. म्हणजेच अमिताभ बच्चन यांची संपत्ती अर्धी श्वेता बच्चनला आणि अर्धी अभिषेक बच्चनला मिळणार आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे.

ऐश्वर्या राय हिला अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीमधून काहीच मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन ही जलसा बंगल्यावरच राहत असल्याचेही सांगितले जातंय. हीच गोष्ट ऐश्वर्या राय हिला आवडत नसल्याचे सांगितले जाते. श्वेता बच्चन हिचा लेक अगस्त्य नंदा याने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. त्याचा पहिला चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. घटस्फोटाच्या चर्चांमध्येच आता अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचा विषय पुढे आलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;