कोकणात जाणाऱ्या दोन ST बसचा अपघात; कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे बस एकमेकांवर आदळल्या

कोकणात जाणाऱ्या दोन ST बसचा अपघात; कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे बस एकमेकांवर आदळल्या

गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमानी गावी निघाले आहेत. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या आहे. त्यामुळे रोज कोकणात जाणाऱ्या गाड्या सुटत असून प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात कशेडी घाटात झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

गणोशोत्स्वासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन बसचा कशेडी घाटात अपघात झाला आहे. कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरनं अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या दोन बस एकमेकांवर आदळ्यामुळे हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये सुमारे 80 प्रवाशी होते. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. सगळे प्रवासी सुखरुप असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी अपघाताची माहिची घेतली. तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची सख्या वाढल्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव ते लोनेरे या दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;