अल्पवयीन मुलीचा विनयभंग; भाजपच्या नगरसेवकाला अटक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; भाजपच्या नगरसेवकाला अटक

राज्यात बालिका, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार तसेच बदलापूर प्रकरणावरून नागरिकांमध्ये आजही संताप आहे. तरीही भाजपच्या नगरसेवकाने कोचिंग क्लासवरून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी नगरसेवकाला अटक केली असून, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हितेश रामकृष्ण कुंभार (रा. मनकर सोसायटी, अकोले, ता. अकोले, जि. नगर) असे अटक करण्यात आलेल्या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी नगरसेवक कुंभार हा गेल्या पंधरा दिवसांपासून सदर अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता. कोचिंग क्लास सुटल्यानंतर घरी जात असताना तिच्याकडे एकटक बघून बोलण्याचा प्रयत्न करीत असे. तसेच घरी जात असताना तिचा पाठलाग करायचा. दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलगी क्लास सुटल्यानंतर घरी जात असताना आरोपी कुंभार याने तिचा हात पकडून जवळ ओढले व ‘तू मला आवडतेस’ असे म्हणून तिच्या अंगावर हात फिरवून लज्जा उत्पन्न होईल, अशी कृती केली. त्यानंतर सदर मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपीवर मंगळवारी (दि. 3) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सदर आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.

 खंडणीप्रकरणी तुरुंगवास

आपण भाजपचे नगरसेवक असल्याचे सांगत याच हितेश कुंभारने 23 डिसेंबर 2023 रोजी कल्याणमधील (मुंबई) कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लैला डान्सबार चालकाकडे खंडणी मागितली होती. त्याबाबत कोनगाव ठाण्यात नगरसेवक कुंभार याच्यासह दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुह्यात हितेश कुंभार तुरुंगात होता. अनेक दिवसांनंतर न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले. हा गुन्हा दाखल असतानाच आता त्याच्यावर अकोले ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;