Mumbai News – चेंबूरमध्ये दुमजली इमारतीचा भाग कोसळला, दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
दुमजली निवासी इमारतीचा भाग कोसळून दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूरमध्ये घडली. तर या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली आहे. कविता साळवे असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंबूरमधील एकता मित्र मंडळातील सरस्वती गल्ली येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
पोलादी चॅनेल सैल झाल्याने ग्राऊंड प्लस वन इमारतीचा काही भाग कोसळला. या दुःखद घटनेत खुशी साळवे या दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. तिला मृत अवस्थेत रुग्णालयात आणले होते. महापालिका प्रशासन आणि पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List