Kandahar Hijack : सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने केलेल्या एका फेक कॉलमुळे सारा प्लान फसला, नेमके काय घडले ?

Kandahar Hijack : सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने केलेल्या एका फेक कॉलमुळे सारा प्लान फसला, नेमके काय घडले ?

नेटफ्लिक्सवर मल्टी स्टारर IC 814 सिरीज चांगलीच गाजत आहे. साल 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्स फ्लाईट IC 814 चे अतिरेक्यांनी अपहरण केले होते. त्यावेळी प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी मौलाना मसूद अझर सारख्या अतिरेक्यांना सोडून द्यावे लागल्याने भारताची मोठी नामुष्की झाली होती.25 वर्षांपूर्वी घडलेल्या या अपहरणाची कहाणी पुन्हा चर्चेत आली आहे. या विमान अपहरणात पंजाबच्या अमृतसर येथे अतिरेक्यांनी विमान थांबवूनही आपल्या लष्करी कमांडोंना कारवाई करता आली नसल्याने या विमान अपहरणात यंत्रणांची नेमकी चूक कुठे झाली यावर चर्चा होत आहे.

24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाईन्स IC 814 फ्लाईट्सचे नेपाळची राजधानी काठमांडूच्या विमानतळावरुन दिल्लीसाठी उड्डाण घेतल्यानंतर 40 मिनिटांनी पाच मास्कधारी अतिरेक्यांनी अपहरण केले होते.या विमानाचे पायलट देवी शरण यांना अतिरेक्यांनी या विमानाला पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये नेण्याचे आदेश दिले होते. परंतू पाकिस्तानातील एअर ट्रॅफीक कंट्रोलरनी विमानाला पाकिस्तानी धावपट्टीवर उतरण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर विमानात विमानात अवघे दहा मिनिटांचे इंधन शिल्लक राहिल्यानंतर पंजाबच्या अमृतसर येथील विमानतळावर अखेर हे अपहृत विमान उतरविण्यात आले होते.

विमानात पुन्हा इंधन भरल्यानंतर हायजॅकरनी विमानाला लाहोरला नेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पाकिस्तानी एटीसीने विमानतळाच्या धावपट्टीलवरील सर्व लाईट्स आणि नेव्हीगेशनल सुविधा बंद केल्या. परंतू शेवटच्या मिनिटाला पाकिस्तानात विमानाला लॅण्ड करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आणि इथेच त्यांनी इंधन भरून विमान दुबईला रवाना करायचे होते. परवानगी नाकारल्यानंतर, त्यांनी UAE मधील अल मिन्हाद हवाई तळावर विमान उतरविले. तेथे अपहरणकर्त्यांनी 176 प्रवाशांपैकी 27  प्रवाशांना सोडले, त्यात 25 वर्षीय रुपिन कात्याल यांचा मृतदेह होता.

फेक कॉल आला आणि खेळ संपला

अपहरणकर्त्यांनी रुपिन कात्याल यांना विमानात ठार करीत सर्व प्रवाशांची हीच गत करण्याच्या धमक्या देत भारत सरकारकडे तुरुंगातील अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली होती. विमान अमृतसर विमानतळावर असताना केंद्र सरकारचे संयुक्त सचिव जे लाल यांच्या नावाने कोणी तरी फेक कॉल केल्याने विमानाला अमृतसरहून उड्डाण करण्याची आणि भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडण्याची परवानगी  मिळाल्याचे सरकारी सूत्रांनी एका चॅनलशी बोलताना सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;