शाहिदचं नाव येताच गोंधळली बेबो, नाव ऐकून करीनाने अशी दिली प्रतिक्रिया

शाहिदचं नाव येताच गोंधळली बेबो, नाव ऐकून करीनाने अशी दिली प्रतिक्रिया

करीना कपूर खानचा चित्रपट ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ रिलीजसाठी सज्ज झालाय. या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी लाँच करण्यात आला. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमादरम्यान करिनासोबत चित्रपटाची निर्माती एकता कपूर आणि दिग्दर्शक हंसल मेहता देखील उपस्थित होते. यादरम्यान एका पत्रकाराने शाहिद हे नाव घेतल्यानंतर करीनाने थोडी विचित्र प्रतिक्रिया दिली. उपस्थित असलेले काही लोकं मध्येच ओरडले. त्यामुळे अभिनेत्री गोंधळून गेली होती.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने हंसल मेहताच्या शाहिद चित्रपटाचे खूप कौतुक केले. हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात राजकुमार राव मुख्य भूमिकेत होता. चित्रपट वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते शाहिद आझमी यांच्या जीवनावर आधारित होता. ज्यांची २०१० मध्ये हत्या झाली होती. ‘शाहिद’ चित्रपटाचे नाव येताच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या करीना कपूरलाही धक्का बसला आणि तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.

एका पत्रकाराने हंसल मेहता यांना विचारले की, त्यांनी शाहीदसारखा चित्रपटही केला होता, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यावर उपस्थित इतर लोकांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली.

शाहिदचे नाव समोर येताच करीना कपूर हिने वेगळीच प्रतिक्रिया दिली. तिला आधी धक्का बसला आणि मग हसत हसत प्रश्न ऐकत राहिली. करिनाच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. करीना आणि अभिनेता शाहिद कपूर दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. अनेकवेळा इव्हेंट्समध्ये करिनाच्या समोर शाहिदचा उल्लेख झाला आहे. मात्र, यावेळी पत्रकाराने शाहिद कपूरचा उल्लेख केला नसून हंसल मेहताचा २०१३ मध्ये आलेल्या शाहिदचा उल्लेख केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

करिनाच्या द बकिंगहॅम मर्डर्सबद्दल सांगायचे तर, सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला असून सिनेमा चर्चेत आहे. ट्रेलर लाँच करताना कॅप्शन दिले होते की, सर्वत्र फसवणूक होत असताना तुम्ही कोणावर विश्वास ठेवू शकता? ‘द बकिंघम मर्डर्स’ 13 सप्टेंबरला रिलीज होणार असून त्यात किथ ॲलन आणि रणवीर ब्रार यांच्याही भूमिका आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;