अखेर सरकारला जाग… जीआर काढला; कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

अखेर सरकारला जाग… जीआर काढला; कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोलमाफ करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक काढत याची घोषणा केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे टोलमाफ करण्याची मागणी केली होती. त्याबाबतचे पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना दिले होते.

गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक कोकणात जातात. त्यासाठी मुंबई पुण्यातून अनेक भाविक खासगी वाहनांनी आपल्या गावी जातात. त्यामुळे सरकारने या गाड्यांना टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकानुसार 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टोलमाफीसाठी भाविकांना आपल्या गाड्यांवर ‘”गणेशोस्तव 2024, कोकण दर्शन” असे लिहलेले स्टिकर जवळच्या वाहतूक पोलीस चौकी किंवा आरटीओ कार्यालयातून घ्यावा लागणार आहे. तो स्टिकर त्यांना त्यांच्या गाडीवर चिकटवावा लागणार आहे. त्या स्टिकरवर गाडी चालकाचे लिहावे लागणार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;